नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील सौ. निलम रामकृष्ण पाटील, घर क्र. 545, रबाळे, अयप्पा मंदिराजवळ, घणसोली. यांचे अनधिकृत बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरू केले होते. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका व मे. सिडको यांच्या संयुक्त्‍ तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 1 पोकलेन, 10 कामगार व घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, पोलीस पथक तैनात होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *