अशोक गायकवाड
मुंबई : सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन संपन्न झाले यावेळी शिवानंद टाकसाळे बोलत होते.
रविवार दि.१२ मे रोजी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन महात्मा गांधी हाँल ,एस व्ही रोड ,तलावाजवळ ,वांद्रे (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद टाकसाळे ( आयएएस सेवानिवृत्त), विनायक विसपुते (असि. कमिश्नर मुंबई महापालिका), डॉ. अभय विसपुते (डायरेक्टर एस आर व्ही हॉस्पिटलस् ग्रुप्स्,), प्रा.श्रीकांत मुरलीधर सोनवणे (MA ,MMCJ , Ph.d.IEC. (डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स, पत्रकारिता महाविद्यालय नाशिक), डॉ अजय भामरे,( प्र कुलगुरू मुंबई विद्यापीठ), अँड.सी.डी.सोनार (मार्गदर्शक धुळे सोनार समाज),
अँड. राजन दीक्षित (सोलापूर उपाध्यक्ष, भारतीय ओबीसी संघटन दिल्ली )सुरेखा सोनार, (नगरसेविका, मिरा -भाईंदर महानगरपालिका) प्रभाकरजी मोरे(ट्रस्टी, मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ तसेच संस्थापक जन्मबंध फाउंडेशन), प्रकाश खरोटे (अध्यक्ष,मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ)आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार आणि दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मोरे यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात सांगितले. की, कोरोना महामारीने दोन अडीच वर्षे सर्व संपूर्ण जग ठप्प झाले होते, अशा परिस्थितीत जगाबरोबर समाजानेही कोरोना परिस्थितीचा मुकाबला केला. अशा परिस्थितीतून सावरुन आजचा मुंबई ऐक्यवर्धक मंडळाचा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,असे यावेळी सांगितले. मंडळाचे सचिव घनःशाम सोनार यांनी मंडळाचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर वाचून दाखविला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे कामाचे कौतुक केले. तसेच सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केले आहे अश्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मुंबई तसेच मुंबई परिसरातील समाजाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामध्ये नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय खरोटे सचिव हेमकांत सोनार तसेच कळवा समाजाचे अध्यक्ष चैतन्य वानखेडे तर धुळे येथून अँड. राकेश रनाळकर तसेच अनेक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव घनश्याम सोनार , घनश्याम विसपुते , सुनील सोनानिस , रत्नाकर वडनेरे , विशाल सोनार, वसंत सोनार , जयेश खरोटे, संजय विभांडीक, आशा खरोटे , अनुराधा वानखेडे, वर्षा सोनवणे ,पुनम सोनवणे आदींनी अधिक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी सोनार (साम टीव्ही)यांनी केले तर उपस्थितांचे आभार घनःशाम विसपुते यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
