डोंबिवली : वाल्मिकी बेडर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज डोंबिवली येथे भेट घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सदस्य असलेली शेकडो कुटुंबे कल्याण लोकसभेत वास्तव्याला आहेत. हे सर्वजण सक्रियपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहणार असून कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व विकासाने प्रभावित होऊन आपण हा पाठिंबा देत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले असून येत्या २० मे रोजी सर्वांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
