मुंबई : बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डिसप्ले मॉनिटर बंद पडल्याच्या घटना आहेत.मात्र सीसीटीव्ही मॉनिटर बंद पडले असले तरी त्याचे रेकॉर्डींग अव्याहत यावेळी सुरू होते.तसेच स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने ती कोणीही भेदू शकत नाही असा दावा करतानाच,जो पर्यंत ईव्हीएमचे सील तोडलेले नसतात तोपर्यंत ते सुरक्षित असतात असतात असा खुलासा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेत केला.
चौथ्या पट्ट्यातील मतदान पार पडल्यानंतर बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या घटना आहेत.येथिल सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे ४५ मिनिटे बंद असल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. शिवाय काही राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांना याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत.बारामती आणि शिरूर येथिल ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही काही वेळेसाठी बंद पडले होते.मात्र मतदान यंत्रे असलेल्या स्ट्राँग रुममध्ये आणि आसपासच्या परिसरात व्हिडीओ लावण्यात आलेले असतात. शिवाय या स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत असल्याने ती कोणीही भेदू शकत नाही.जो पर्यंत ईव्हीएमच सील तोडले जात नाही तोपर्यंत ते कायद्याने सुरक्षित समजले जातात अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.शिवाय अशा ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी सुद्धा तैनात असतात.स्ट्राँग रुमबाहेर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा,सीआरपीएफ आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचा पहारा असतो.तीन टप्प्यातील यंत्रणा भेदून आत जाणे कुणालाही शक्य नाही.त्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याने फारसा फरक पडत नाही असेही त्यांनी सांगितले.
बीडमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकाराबाबत आपल्याकडे तक्रार आली नसल्याचे चोकलिंगम म्हणाले. अशी तक्रार आल्यास कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले. चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले.काही उमेदवारांची नावे घेऊन त्यांना मतदान करा असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तरीही यंत्रणा गप्प आहेत, असा प्रश्न केला असता अशा प्रकरणांत कारवाई केली आहे. त्याबाबतची आकडेवारी जाहीर करू, असे चोकलिंगम म्हणाले. मात्र, काय कारवाई केली याची माहिती देण्यास त्यांनी बगल दिली.पाचव्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील १३ मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होत असून यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा १ मतदारसंघातील २४ हजार ५७९ मतदान केंद्रांत मतदान होणार आहेत. पाचव्या टप्प्यात मुबंई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघांत संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.