निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु

मुंबई : आचारसंहिता लागू होऊन आठवडाही होत नाही तोच पंतनगरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारीपथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पथकाने गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका बिल्डरकडून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि भरारी पथक अधिक तपास करत आहेत.

देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. मंगळवारी रात्री पंतनगर पोलिसांनी गस्त घालत असताना एक संशियत गाडी थांबवली आणि तपासणी केली. या गाडीत पोलिसांना 72 लाख रुपयांची रोख आढळली आहे. मंगळवारी रात्रीपासून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

पोलिसांनी पकडलेल्या गाडीमध्ये दिलीप नाथानी, अतुल नाथानी हे दोन व्यक्ती होते, हे इनकम टॅक्स सल्लागार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पंतनगर पोलिसांसह त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे पैसे कोणाचे आहेत आणि कशासाठी नेले जात होते, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *