मुंबई : सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीईटी कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एक लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७८ परीक्षा केंद्रावर एक लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

सीईटी सेलच्या वतीने यावर्षी परीक्षेसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्षे आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *