मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी २१ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाचा किंवा अन्य वेबसाईटचा वापर करता येईल.
अन्य वेबसाईट पुढीलप्रमाणे
- www.mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- http://results.targetpublications.org
