मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, संथ गतीने होणाऱ्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं होतं. ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरप्रतिक्रिया देत, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे 4 जून नंतरच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पार्श्वभूमी तयार करत आहेत.  शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *