अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत.
अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
सुरत पोलिसांकडून मौलवी सोहेल अबुबकरच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यावेळीच गुजरातमध्ये चार ईसीस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. गुजरात पोलिसांकडून सर्व यंत्रणा अलर्टमोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बारकाईने सर्व ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे.
आयपीएल सामन्याआधीच अटक
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 21 मे रोजी आयपीएलमधील प्लेऑफचा सामना होणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात ही लढत होणार आहे. त्यामुळे या मॅचची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.