अनिल ठाणेकर
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे मतदाना दिवशी उघड झाल्यानंतर प्रशासना विरोधात सर्वच स्तरातुन टिकेची झोड उठत आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ‘नवमतदार नोंदणी’ तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 022 – 25333850 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात निवडणुक यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला होता. मतदार यादीतुन नावे वगळण्यात आल्याने अनेक जुन्या जाणत्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहावे लागले होते. ही बाब गंभीरतेने घेत आ. संजय केळकर यांच्या पुढाकाराने सचिन शिनगारे यांनी मतदार नोंदणी व दुरुस्ती मोहिम सुरु केली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि मतदार ओळखपत्रामध्ये दुरुस्ती करण्याकरिता, तसेच, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असतील अशांसाठी विशेष मोहिम सुरु केली आहे.त्यानुसार, ज्यांना मतदार नोंदणी करावयाची आहे, त्यांनी स्वतःचा फोटो,आधारकार्ड, वास्तव्याचा पुरावा आदी आवश्यक स्वयंसांक्षाकित कागदपत्रांसह जनसेवा कार्यालय, जय भवानी नगर, मराठी शाळे मागे, माजिवडा ठाणे प. 400601.अथवा श्रमसाफल्य, वीर सावरकर मार्ग, तीन पेट्रोल पंप जवळ, आराम बाग समोर, ठाणे प. 400602. या पत्यावर तसेच 022 – 25333850 या व सचिन शिनगारे यांना या 98927 66111 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.