नवी दिल्ली : एखाद्या आरोपीला खटला चालविल्याशिवाय डांबून ठेवणे हे स्वातंत्र्याला बाधा पोहोचवण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा कथित सहकारी असलेल्या प्रेम प्रकाश यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्याच्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) प्रथेविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली.