नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

काही दिवसांपूर्वी कनिष्ठ न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आता मनीष सिसोदिया यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली जण्याची शक्यता आहे.

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक केली होती. त्यानंतर मनीष सिसोदिया यांना ९ मार्च २०२३ रोजी ईडीकडून अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांनी जामीन मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *