पुणे अपघातातील आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची तयारी,

0 बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात पोलिस दाद मागणार

0 मुलाच्या बापाला औरंगाबादमधून अटक

पुणे: पुण्यातील श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत बाईकवरून चाललेल्या जोडप्याला आपल्या आलिशान अशा पॉर्शे कारने चिरडले होते. त्यात बाईकवरील त्या दोघांचा दर्दनाक मृत्यू झाला. या श्रीमंत बापाच्या मुलाला बेड्या ठोकून जेलमध्ये टाकण्याएवेजी पुणे पोलिसांनी अत्यंत तत्परतेने त्याला २४ तासात जामिन मिळवून देण्यात पुढाकार घेतला. यावरून अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर आज गृहमंत्र्यांनी पुणे गाठत तपासाची माहीती घेतली. या अपघातातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होणार म्हणजे होणारच असे फडणवीसांनी आज ठणकावून सांगितले. स्वता गृहमंत्री फडणवीसच इनअक्शन आल्यामुळे आता या श्रीमंत बापाच्या मुलाची मस्ती उतरली जाणार आहे.

पुण्यातील अपघात हा अत्यंत गंभीर असून यामध्ये 304 कलमानुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे, तसेच मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आरोपी हा अल्पवयीन असला तरी त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी पोलिसांची आहे. त्यामुळे बालहक्क मंडळाच्या आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचंही ते म्हणाले. आरोपीची रिमांड मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही फडणवीसांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात येऊत तातडीने पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पुणे अपघातात आतापर्यंत काय कायदेशीर पाऊलं उचलली याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आरोपीवर 304 कलम

पुण्यातील अपघात गंभीर आहे. पोलीसांनी कारवाई करत ज्युविनाईल जस्टिसकडे 304 कलम मेंशन केलं आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे. त्यामुळे त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी बालहक्क मंडळाकडे करण्यात आली आहे. यापुढची कारवाईदेखील बालहक्क मंडळाच्या सूचनेप्रमाणे करण्यात येईल.

ज्युव्हिनाईल जस्टिस अंतर्गत पालकावर पहिली कारवाई केली जातेय, हे पालकांनी लक्षात ठेवावं. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असं पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा हिनियस क्राईम आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वडिलांना औरंगाबादमधून अटक

सोमवारी आरोपीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून त्याचे वडील फरार होते. पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरू होता. यादरम्यान आज पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली. याशिवाय बार मालक आणि मॅनेजरलाही अटक करण्यात आली. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असतानाही त्यांनी त्याला मद्य दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *