बारावीच्या निकालात कोकण नंबर वन
पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून ९३.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यापैकी कोकणात सर्वाधिक कोकण ९७.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर सर्वाधिक कमी असा ९१.९५ टक्के निकाल मुंबईचा लागला आहे. मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला.
यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता.
बारावी परीक्षेचे दि.२१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोकण विभागचा निकाल ९७.५१ टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई ९१.९५ एवढा लागला आहे.
निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानी राहीला आहे. पुणे विभागात ९४.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर (९४.२४), छत्रपती संभाजीनगर ९४.०४ टक्के, अमरावती ९३ टक्के, लातूर ९२.३६ टक्के, नागपूर ९२.१२ टक्के असा निकाल लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळालातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने १०० टक्के गुण घेतले आहेत. तिला परीक्षेत ५८२ तर क्रीडा विषयात १८ गुण मिळाले.