परवा झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी ठार झाले. त्यांच्या बरोबर इराणचे परराष्ट्र मंत्री तसेच सहा अन्य उच्च अधिकारी प्रवास करत होते. हे हेलिकॉप्टर अपघाताने पडले की इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादचा त्या मागे हात आहे असा सवाल इराणमध्ये विचारला जातो आहे. इराण हा देश मुळात वादग्रस्त असून त्यांनी अनेकदा पाश्चात्य राष्ट्रांच्या, विशेषतः अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का दिलेला आहे. रशियाच्या मदतीने इराण सतत अमेरिकेवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत असतो. आणि त्यातूनच त्यांनी अण्वस्त्र विकसित कऱण्याचे ठरवले आहे. इराणवर अमेरिकेने गेली तीन दशके विविध प्रकारांनी कठोर आर्थिक निर्बध लादले. पण तो देश बधला नाही. आयातुल्ला खोमेनी यांनी ऐंशीच्या दशकात इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवली आणि तिथल्या परंपरागत बादशहा इराणचा शहा याला पळवून लावले. ती इस्लामिक क्रांती अधिकाधिक कट्टर रूप धारण करते आहे. गेली तीन दशके इराणवर मुल्ला मौलवींचेच राज्य असून अली खामेनी हे धर्मगुरु सध्या तिथले सर्वोच्च नेते आहेत. त्यांनीच राष्ट्राध्यक्ष रईसी यांची नेमणूक 2021 मध्ये त्या पदावर केली होती. आता हेलिकॉप्टर दुर्घटने नंतर त्यांनी तातडीने हंगामी राष्ट्राध्यक्षांची व हंगामी परराष्ट्र मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे. इराणच्या डोळ्यात सातत्याने इस्त्रायल सलत असतो. मुस्लीम अरब जगतात ज्यूंचे राष्ट्र हा त्यांना आपला धर्माचाच पराभव वाटतो आणि म्हणूनच इस्त्रायलच्या विरोधात इराण नेहमीच उभा राहतो. हम्मास इस्त्रायल युद्धात इराणने उघड उघड क्रूर दहशतवादी हम्मास संघटनेची बाजू घेतली आहे. गेल्या ऑक्टोबर पासून पॅलेस्टाईनी दहशतवादी बंडखोर गट हम्मासचा निःपात कऱण्यासाठी इस्त्रायलने मोहीम उघडली आहे. त्यात हजारो पॅलेस्टाईनी बंडखोरांसह तितक्याच निरपराध गरीब अरब नागरिकांचाही मृत्यु ओढवला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एके सकाळी गाझा पट्टीत वावरणाऱ्या हम्मासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये घुसून सुमारे अडीचशे इस्त्रायली नागरिकांना, मुलांना व महिलांना ताब्यात घेतले. ओलीस ठेवले. इस्त्रायलला धडा शिकवण्याचा त्यांचा उद्देष होता. गाझा पट्टीत वसवलेल्या ज्यू शेतकऱ्यांना व नागरिकांना हाकलून द्या आणि पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता द्या या प्रमुख मागण्या हम्मासने पुढे ठेवल्या होत्या. त्या भीषण दहशतवादी हल्ल्या नंतर इस्त्रायल हादरले. भारत व अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी हम्मासच्या या दहशतवादी कृत्यांचा निषेधच केला. पण इराणने हम्मास वीरांचे कौतुक केले. त्यांना सशस्त्र मदत पुरवण्याचे काम इराणने सुरुच ठेवेल. इराणी हद्दीतही अनेक पॅलेस्टाईनी बंडखोरांना आश्रय लाभलेला असून तेथून ते इस्त्रायलवर ड्रोनचे हल्ले चढवतात. इस्त्रयली सीमे लगतच्या गावांवर तोफ गोळेही इराणी हद्दीतून सोडले जातात. या वातावरणात इस्त्रायलने हम्मास दहशतवादाचा संपूर्ण बीमोड कऱण्याचा विडा उचलला आणि आधी जाहीर करून गाझा पट्टीत रणगाडे घुसवले. लष्करी दलांनी चढाई सुरु केली. एकेक गाव, वस्ती व खेडे उध्वस्त करीत गेले सात महिने इस्त्रायलची चढाई सुरुच असून त्यात आजवर जरी काही शे इस्त्रायली सैनिक ठार झाले असले तरी पॅलेस्टाईनी बाजूचे मात्र 34 – 35 हजार लोक मारले गेले आहेत. त्यात महिला व मुलांची संख्या मोठी आहे. अर्थात पॅलेस्टाईनी गनिमी युद्ध लढत आहेत. हम्मास्च्या दहशतवाद्यांनी मोठ मोठ्या हॉस्पिटलांच्या खाली भुयारी तळ उभारले होते, त्यामुळे इस्त्रायलला त्या हॉस्पिटलांवरही हल्ले करावे लागले. पण नेमक्या त्याच कारणासाठी मानवता विरोधी कृत्ये केल्याचा गुन्हा इस्त्रायलाच्या माथी येतो आहे. इस्त्रायल केवळ हम्मासला संपवत आहे असे नाही तर ते पॅलेस्टाईनींचा नरसंहार करत आहेत असे युनोच्या अनेक सदस्य देशांना वाटते आहे. पण अमेरिका अद्यापी इस्त्रायलला पूर्ण पाठिंबा देत असून पॅलेस्टाईंनीच्या आक्रोशोकडे बहुसंख्य पाश्चात्य राष्ट्रेही दुर्लक्ष्य करत आहेत. हा संघर्ष आता संपवा आणि इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्या बरोबरच पॅलेस्टाईंनीचा संहार थांबवा अशी मागणी जगात वाढत आहे. अलिकडेच जेनेव्हा स्थित आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण ( इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट – आयसीसी ) यांनी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू तसेच त्यांचे संरक्षण मंत्री योव्हा गालंट तसेच हम्मासचे तीन कमांडर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे. अर्थातच अजुनी तसे वॉरंट जारी झालेले नाही आणि झाले तरी इस्त्रायल ते मान्य करण्याची शक्यताही नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्त्रायला सुरुवातीला असणारी सहानुभूती आता उताराला लागली आहे इतके त्यांतून स्पष्ट होते. इस्त्रायलने हम्मास बरोबर तडजोड करावी, शांततापूर्ण वातावरणात चर्चा कारून प्रश्न सोडवावेत असे प्रयत्नही झाले, पण इस्त्रायलने ते सतत धुडकावून लावले आहेत. इराण विरोधातही इस्त्रायलचा सूर गेले काही महिने तीव्रतर होतो आहे. तुमच्या सीमेत घुसून बंडखोर दहशतवाद्यांना ठोकून कढण्याचे काम नक्की करू अशीही भाषा इस्त्रायलने केली आहे. तर इऱाणनेही ज्यूंच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. इराण हे वेगाने अण्स्त्रधारी राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे हेही इथे महत्वाचे ठरते. मध्यपूर्वेतील व अरब मुस्लीम जगतातील अशा एकूणच तणावाच्या वातावरणात इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा गूढ मृत्यु होणे ही बाब गंभीरच ठरत असून जगाचे हृदयाचे ठोके वाढवणारी अशी ही घटना आहे. दोन दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेनी आमीर अब्दोल्लाहैन अशा दोघांसह आणखी काही अधिकारी प्रवास करत होते. त्यांचे हेलिकॉप्टर ईशान्य ईराणमधील डोंगराळ प्रदेशात कोसळले. अमेरिकन बनावटीचे बेल एअरचे हे हेलिकॉप्टर का व कसे कोसळले याची चौकसी सध्या सुरु असून अपघाता नंतर पहिला संशय इस्त्रायली गुपत्पेर संघटना मोसादच्या घातपाती कृत्याबाबत, व्यक्त झाला आहे. अर्थताच इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने खुलासा करू आमाचा त्यात काही हात नस्लयाचे स्पष्ट केले असले तरी इराणी प्रशसानाने ती शक्यता अजुनी नाकारलेली नाही. अपघाती मृत्युचे गूढ वाढत असतानाच रईसी यांच्या संदर्भात अन्य जी माहिती पुढे आलेली आहे ती दर्शवते की रईसी हे काही साधेसुधे शासक नव्हते. तर ते अत्यंत क्रूरकर्मा शासक म्हणून कुख्यात होते. ते इराणच्या न्याय व्यवस्थेचे प्रमुख न्यायाधीश असताना, 1988 मध्ये शेकडो इराणी विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले गेले आणि त्या सर्वांना तुरुंगातच ठार केले गेले. तो डाग त्यांच्या माथी होता. अलिकडेच इरणमध्ये महिलांनी आंदोलन केले. इराणी महिलांचे केसाचेही दर्शन समाजात होता कामा नये असा बुरखा वापरण्याची सक्ती होती. हा मौलवी मुल्लांचा हा हुकूम इराणी महिलांनी धुडकावला तेंव्हा माशा अमीनी या कार्यकर्तीची भर रस्त्यात हत्या झाली. मग ते आंदोलन भडकले. तेंव्हा इब्राहीम रईसीच्या सैनिकांनी त्या महिलांचेही शिरकाण केले. आंदोलन चिरडून टाकले. इराणला अति उजव्या विचारधारे बरोबरच अण्वस्त्रांकडे वेगाने नेणारा नेता अशी रईसींची प्रतिमा होती. जेंव्हा रशियाने युक्रेनचा घास गिळायला चाल केली तेव्हा सर्वात प्रथम रईसींनी रशियाला पठिंबा दर्शवला आणि पाठबळ दिले. आताही रईसींच्या अपघाता नंतर रशियाने म्हटले आहे की अमेरिकेने इराण विरोधात जे क्रूर निर्बंध लादले त्यातूनच हा अपघात घडला आहे. अमेरिकन कंपनी बेल एअरच्या हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळवणे इराणी सैन्यासाठी अवघड काम झाले होते. त्यातून कमी देख-भाल दुरुस्ती केली जात होती. अपघाताचे तेही एक कारण असू शकते असे रशियाने अधिकृतरीत्या म्हटले आहे. भारत या सर्वाकडे सावधतेने पाहतो आहे. आपल्याला इरणची मैत्री हवी आहे. त्यासठी आपण अमेरिकेचे निर्बंधांकडे दुर्लक्ष्य करतो. एक तर इराणी तेल हे भारताला स्वस्त मिळते. शिवाय चाबहार बंदराची उभारणी व संचालनाचे दहा वर्षांचे कंत्राट अलिकडेच भारताला मिळाले. त्यात देकारात रईसींचा हात होता. भारत सरकारने त्यांच्या मृत्युब्द्ल तीव्र दुःख व्यक्त करतानाच देशभरात एक दिवसाचा सरकारी दुखवटाही जाहीर केला आहे. रईसींच्या जागी कायमस्वरुपी कोणाची नेमणूक होते हे पाहणे भरातासाठी महत्वाचे ठरणार आहे.