मुंबई : दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रूळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून मान्सून तयारीवर जोर देत आहे.

यंदाही मध्य आणि पश्चिम रेल्वेने नाले सफाई, कल्व्हर्टची स्वच्छता आणि नाल्यावर लोखंडी  जाळ्या बसविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. पावसामुळे रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्यास त्याचा उपसा करण्यासाठी एकूण २९२ पंप महामुंबईत लावण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे.रेल्वे प्रशासनाची मान्सून पूर्व तयारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, झाडांच्या फांद्याची छाटणी, अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकातील नाल्यामधील स्वच्छतेवर रेल्वेकडून उपयोज केल्या जात आहे.

स्थानकातील नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्थानकात पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळे मध्य रेल्वेने नाल्यातील कचरा रोखण्याच्या दृष्टीने नाल्यांवर लोखंडी जाळ्या लावण्याच्या कामा सुरु आहे.

२९२ पंप बसविणार

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरील पाणी साचण्याच्या दृष्टीने संवदेनशील असलेल्या २४ ठिकाणी १९२ पंप बसविण्यात येणार आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विकोळी, कांजूरमार्ग आणि हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळक नगर, गुरू तेग बहादूर (जीटीबी) नगरचा समावेश आहे. आहेत.

या ठिकाणी १२.५ ते १०० अश्वशक्तीचे १६१ पंप कार्यान्वित केले आहे. याच ठिकाणी मुंबई महापालिकेने ३१ पंप उभारले आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यान दादर, अंधेरी, बोरिवली आणि भाईंदर स्थानक परिसरात एकूण १०० पंप कार्यान्वित केले आहेत.

११९.८२ किमी नालेसफाई

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील ११९.८२ किमी नालेसफाईपैकी ६८.४४ किमीची नालेसफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित ५१.३८ किमीची नालेसफाईचे काम सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवरील ५० किमीच्या नाल्यांपैकी ३८ किमी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाई लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

९२ कल्व्हर्ट्स साफसफाई

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागांवरील ९२ कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत आणि सध्या आणखी ६४ कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार-एलटीटी परिसर, टिळक नगर या भागात आरसीसी बॉक्स बसवून कल्व्हर्ट विस्ताराचे काम करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *