नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *