अनिल ठाणेकर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडली आहे. असे असताना भुजबळसाहेबांबद्दल निलेश राणे यांचे ट्विट करणे चुकीचे आहे. खरतर निलेश राणे आणि नितेश राणे यांनी भाजपला अनेकदा अडचणीत आणले आहे, अशी प्रतिक्रया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.

लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. तसेच ‘भाजपच्या ४०० पार मोहिमेचा निवडणुकीच्या संभाव्यतेवर नकारात्मक परिणाम झाला’ असे भुजबळ म्हटल्याचा संदर्भ एका वृत्तपत्राने दिला आहे. हाच संदर्भ ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी भुजबळांवर जोरदार हल्ला चढविला आहे. श्री छगन भुजबळांना आवरले पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचे का ऐकून घ्यावे ? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असेच पाहिजे, आम्हाला तसेच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना, लोकसभा व विधानसभा निवडणुकीबबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडली आहे. असे असताना भुजबळसाहेबांबद्दल निलेश राणे यांचे ट्विट करणे चुकीचे आहे. खरतर निलेश राणे आणि नितेश राणे यांनी भाजपला अनेकदा अडचणीत आणले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते,आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात महायुतीतील ही धुसफूस राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर महायुतीत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे, असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *