दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढत्या सोन्या-चांदीच्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. सोन्या चांदीच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपूरमच्या सिल्क साड्या महागल्या आहेत. या साड्यांच्या किंमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
वाढत्या सोन्या-चांदीच्या दराचा परिणाम खरेदीदारांच्या खिशावर होत आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपूरमच्या साड्या महागल्या आहेत. कांचीपूरम सिल्क साडीची किंमत गेल्या 8 महिन्यांत 50 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ग्राहक कांचीपूरमच्या साड्याऐवजी इतर साड्यांची खरेदी करण्याकडे वळले आहेत.
सोन्याच्या किमतीमुळे साडीनिर्मितीचा खर्च वाढला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. या काळात मोठ्या प्रमाणात साड्यांची खरेदी होत असते. कांचीपूरम सिल्क साड्या खरेदी करण्याचा हा पीक सीझन आहे. वर्षाची ही वेळ असते, जेव्हा लोक लग्नासाठी कांचीपूरम सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी येतात;पण आता या साड्यांची खरेदी करण्यासाठी खिशावर आणखी बोजा टाकावा लागणार आहे. कारण सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळं जगप्रसिद्ध कांचीपूरमच्या साड्या महागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचा कमी वापर करणाऱ्या साड्यांकडे ग्राहक वळू लागले आहेत. लोक अशा साड्या शोधत आहेत, ज्यात सोने आणि चांदी नाही. कांचीपपूरम सिल्क साड्यांच्या रिटेल टेक्सटाईल चेन ब्रँड ‌‘आरएमकेव्ही‌’ च्या मते किमती वाढल्यामुळे त्यांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे.
दरम्यान, साडी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच ग्राहक विशिष्ट बजेटसह येतात आणि कमी सोने आणि चांदीच्या (कांचीपूरम) रेशमी साड्या पसंत करतात. त्याचप्रमाणे काही ग्राहक त्यांच्या बजेटनुसार साड्यांची संख्या कमी करतात. इतक्या कमी कालावधीत सिल्क साड्यांच्या किमतीत 35 टक्के ते 40 टक्के वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एक ऑक्टोबर 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 5,356 रुपये प्रति ग्रॅम होती. ती 21 मे 2024 रोजी वाढून सहा हजार नऊशे रुपये प्रतिग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीचा भावही वाढत आहे.

चांदी एक लाख रुपये किलो होणार!

मुंबईः 2024 मध्ये सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे; मात्र चांदीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीचा फटका सोन्यालाही बसला आहे. ‌‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन‌’ (आयबीजेए) च्या आकडेवारीनुसार, 23 मे 2024 रोजी चांदी 90 हजार 55 रुपये प्रति किलोवर बंद झाली. 14 फेब्रुवारी 2024 रोजी चांदी 69 हजार 150 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती आणि त्या पातळीपासून चांदीच्या किमती 30 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. येत्या काही दिवसांत चांदी एक लाख रुपयांची पातळी ओलांडू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदीचा वापर दोन आघाड्यांवर होतो. लोक चांदीचे दागिने खरेदी करतात. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांदीमध्ये गुंतवणूक करतात, म्हणून त्याकडे आर्थिक मालमत्ता म्हणूनदेखील पाहिले जाते. त्यामुळे चांदीचा वापर औद्योगिक कारणांसाठीही केला जातो. सौर पॅनल बनवण्यासाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सरकारचे संपूर्ण लक्ष स्वच्छ ऊर्जेवर आहे. सौरऊर्जेपासून वीज निर्मितीला चालना दिली जात आहे. अशा स्थितीत आगामी काळात चांदीची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक कारपासून ते 5 जी सारख्या तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्टीत चांदी वापरली जात आहे. एका अंदाजानुसार, उद्योगात 60 टक्क्यांहून अधिक चांदी वापरली जाते.चांदीचा वापर वाढत आहे पण मागणीनुसार त्याचे उत्पादन होत नाही. 2016 पासून, चांदीच्या खाणकामात सतत घट होत असून मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस चांदीवर कमालीची तेजीत आहे. अलीकडेच ‌‘मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस‌’ने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे, की सोन्यापेक्षा चांदीची वाढ अधिक होईल आणि ते सोन्यालाही मागे टाकेल. गेल्या 15 वर्षांत चांदीने सातत्याने 7 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जर चांदी देशांतर्गत बाजारात एक लाख रुपयांची पातळी गाठू शकते, तर कोमेक्स वर ती प्रति औंस 34 पौंडपर्यंत जाऊ शकते. चांदीच्या दरातील वाढ इथेच थांबणार नसून त्याची चमक आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *