मुंबई : संविधान बदलविण्यासाठी भाजप लोकसभेत 400 पेक्षा अधिक खासदार निवडून पाठविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. राज्यातील महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावं आणि भाजपाचा महाराष्ट्रात पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र निवडणूक लढवावी असा निर्वाणीचा इशारा संविधान बचाव संघर्ष समितीने मविआला दिला आहे.
मात्र, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून न घेतल्यास, भाजपला विरोध दर्शविण्यासाठी आणि भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती आपला सक्षम उमेदवार उभा करेल, असा निर्वाणीचा इशारा संविधान बचाव संघर्ष समितीने महाविकास आघाडीला दिला आहे.
बीआरएस आणि वंचित लोकसभेसाठी गाठ बांधणार?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.
महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिसकटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे.