मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट, नरसोबावाडी यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या मान्यतेने ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, तालुका शिरूर, जिल्हा – कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. ८ ते १० जून २०२४ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ विभागात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी आपले ७० वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या हंगामातील हि दुसरी स्पर्धा आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लबमार्फत दिनांक १ जून २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत.
