नवीमुंबई: नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रात से.15 येथील पामबीच रोड लगत साईबाबा मंदिर, जवळील मोकळया जागेवर विनापरवानगी अनधिकृतपणे साधारणत: 25 पत्र्याच्या झोपडया उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी अवैधरित्या उभारण्यात आलेल्या सर्व झोपडयांवर अतिक्रमण विभाग, घणसोली विभाग कार्यालय यांचेकडून मोहीमे राबवत सर्व झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आयोजित या मोहिमेमध्ये 01 जे.सी.बी., 04 कामगार यांचा समावेश होता. ही धडक मोहिम अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. संजय तायडे व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने राबविण्यात आली. यापुढील काळातही अशा प्रकारची तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.
