दिल्लीत पारा ५२.३ अंशावर

नवी दिल्ली : वातावरणातील बदलामुळे अवघं जग चिंतेत असताना आता सुर्यानेही आपला हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. गेल्या शंभर वर्षातील तापामानाचा विक्रम मोडीत काढत दिल्लीत आज पारा ५२.३ अंशावर चढला. सरासरीपेक्षा हे तापमान जवळपास १३ अंशाने अधिक आहे. दिल्लीमध्ये सूर्य अक्षरशा आग ओकतोय ऑम्लेट शिजायला साधारणात ६३ डिग्री सेल्सियस तापमान लागते यावरून. तुम्हाला दिल्लीतील या भीषण उष्णतेचा अंदाज येईल.

वाढते शहरी करण , बेसुमार जंगलतोड, औद्योगिकरणामुळे वाढते प्रदुषण याची परतफेड निसर्गाकडून ही अशी केली जात आहे. हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली आहे, पण दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्लीतील बहुतांश भागात पारा ५० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगावचीही तीच अवस्था आहे. दिल्लीतील तीन भाग सर्वाधिक तापलेले आहेत. मुंगेशपूरमध्ये सोमवारी पारा 48.8 अंशांवर पोहोचला होता.

दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्लीतील तीव्र ऊन, आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. बुधवारी सकाळी 11.30 वाजता दिल्लीच्या नरेलामध्ये 47 अंश सेल्सिअस आणि नजफगढमध्ये 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुपारी तीन वाजेपर्यंत पारा 52.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दिवसागणिक दिल्लीचा पारा वाढताना दिसत आहे.

उत्तर भारतात उष्णतेची भीषण लाट आली आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही पारा ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. झांशी, यूपीमध्ये दिवसाचे तापमान ४९ अंश होते. आग्रामध्ये पारा ४८.६ अंशांवर आणि वाराणसीमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *