नवी दिल्ली: “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
“सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आघाडी आवश्यक होती, तिथे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आली आणि दोघांचा मिळून एक उमेदवार उभा केला. पंजाबमध्ये भाजपाचं अस्तित्वच नाहीये. म्हणून पंजाबमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो”, असंही अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं.
