सिद्धी माळी ९१ टक्के गुणांसह प्रथम
भिवंडी : ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळाच्या अंजुर येथील संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलने सलग नवव्यांदा १०० टक्के निकालाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत सिद्धी माळी ही ९१ टक्के गुणांसह प्रथम आली असून, संस्थेचे अध्यक्ष राम माळी व सचिव दीपक म्हणेरा यांनी अभिनंदन केले आहे.
अंजूर, भरोडी, अलिमघर, सुरई, सारंगगाव, वेहेळे, भाटाणे, माणकोली, अंजुरदिवे या ९ गावातील तरुणांनी एकत्र येऊन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत अल्प शुल्कामध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते. या शाळेत १४०० विद्यार्थी असून, शाळेचा स्थापनेपासून दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागत आहे. यंदाच्या परीक्षेत ह्रदेश वर्मा याने ९० टक्के, एलिना पाटील हिने ८९ टक्के, आर्यन पाटील याने ८८.२० टक्के, राणी भोईर हिने ८८ टक्के गुण मिळविले. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.
