ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, जांभळी नाका, ठाणे येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुजित भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्रबुद्धे. दिनेश मेहरोल, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस सुजाता घाग, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, ब्लॉक कार्याध्यक्ष सुमीत गुप्ता, अप्पा चव्हाण, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, वाॅर्ड अध्यक्ष विवेक गोडबोले, महिला विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मी वैती, वाॅर्ड अध्यक्ष अश्विनी लाडकर, राझिया शेख, युवती विधानसभा अध्यक्ष झारा शेख, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ज्येष्ठ पदाधिकारी दिपक पाटील तसेच धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पत्रकार दिपक कुरकुंडे व त्यांचे सहकरी उपस्थित होते.