अशोक गायकवाड
रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदार संघासाठी ४ जून २०२४ रोजी मत मोजणी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, जि.रायगड येथे होणार आहे. या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात मत मोजणीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी व मतमोजणीच्या कामाकरीता नियुक्त यांना निवडणूक निर्णय अधिकारी ३२-रायगड लोकसभा मतदार संघ यांनी अधिकृत ओळखपत्र दिले आहे. हे अधिकृत ओळखपत्र धारण करणाऱ्या व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस त्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मतमोजणी होणार आहे. तरी या परिसरात सर्व पक्षाचे प्रतिनिधी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यामुळे सदर परिसरात जनतेच्या जिवीतास व मालमत्ता, आरोग्यास धोका निर्माण होवून सार्वजनिक शांतता बिघडून दंगल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन सदर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सी. आर. पी. सी. १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात काही राजकीय पक्ष, संघटना यांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांचेकडून सार्वजनिक शांततेचा व सुरक्षिततेचा भंग होऊन, गैरप्रकार घडून मतमोजणी प्रक्रियेस बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नमूद ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान शांतता व सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपरोक्त अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणेकरीता दि.०४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग सभोवतालच्या १०० मीटर परिसरात मतमोजणीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी व मतमोजणीच्या कामाकरीता नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी ३२-रायगड लोकसभा मतदार संघ यानो पारीत केलेले अधिकृत ओळखपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ (१) (२) (३) नुसार मनाई करणे आवश्यक आहे.त्यानुसार हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. दि.०४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून मत मोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश अंमलात राहील.