बंगुळूरू: कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली . त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने भारतातून पळ काढला होता. तसेच तो जर्मनीत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपण ३१ मे रोजी भारतात आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा आज सकाळी भारतात दाखल झाला.