वृक्षारोपण मोहीमेत सक्रिय सहभागी होण्याचे नागरिकांना जाहीर आवाहन
नवी मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन ‘आमची जमीन, आमचे भविष्य’ ‘आम्ही जनरेशन रेस्टोरेशन आहोत’ या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे.
या दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबई मधील शासकीय / निमशासकीय / अशासकीय कर्मचारी / सुजाण नागरिक / व्यापारी / युवक- युवती / विद्यार्थी / सामाजिक – सेवाभावी संस्था / महिला बचत गट आदींना किमान एक तरी वृक्षरोप लावण्याचे आवाहन मा.डॉ.कैलास शिंदे, आयुक्त – नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहे.
याकामी रोपांची आवश्यकता असल्यास तसेच रोपे लावण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात – श्रीम. ऋतुजा गवळी, सहाय्यक आयुक्त (उद्यान) – ७९७७६३००६३ तसेच श्री. प्रकाश गिरी, उद्यान अधिक्षक – 9322912801 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे आणि सर्वांनी एकत्र येऊन आपले नवी मुंबई शहर हरित करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन आहे.
