ठाणे : जिल्ह्यात ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ४ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पालकांनी विदयार्थ्यांसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ४ जून पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत पालकांनी अर्ज भरणे आवश्यक आहे. ४ जून नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. तरी पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *