पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल २५ कोटी रुपयांवरुन ९९.९९ कोटी रुपये झाले आहे.

राज्यातील शेळी, मेंढी पालन करणार्‍यांच्या उत्कर्षासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. याला अखेर यश आले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाला बळकटी देण्यासाठी महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महामंडळाचे भागभांडवल २५ कोटी रुपयांवरुन तब्बल ९९.९९ कोटी रुपये करण्यात आले आहे.
महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ झाल्यामुळे शेळी, मेंढी पालन करणार्‍यांच्या विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेळी, मेढी पालकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी परंपरागत शेळी, मेंढी पालन व्यवसायाला तांत्रिक ज्ञान प्राप्त करून देणे, व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नाला अधिक भाव मिळवून देण्याबरोबरच त्यांचा उत्कर्ष व सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी आणि मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील शेळी, मेंढ्यांच्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या स्थानिक प्रजातीमध्ये सुधारणा करणे, त्यांचे संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आरोग्यविषयक सुविधा तसेच बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. या योजनांना आणि उपक्रमांना गती देण्यासाठी मेंढी व शेळी महामंडळाच्या भागभांडवलात २५ कोटी रुपयांवरुन ९९.९९ कोटी रुपये इतकी भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा परिणाम समाजात ठळकपणे जाणवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *