एकला अटक
उल्हासनगर : बांधकाम व्यवसायात सलग्न असलेल्या भाजपा कार्यकर्त्या वर खंडणी साठी जीवघेणा हल्ला करणाऱ्या निलेश सरोजा याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गजाआड केले आहे. भाजप कार्यकर्त्यावर झालेला हल्ला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उल्हासनगर कॅंप चार मराठा सेक्शन परिसरात भाजपाचे संतोष तांबे आणि सुनील तांबेकर या दोघांचा बांधकामाचा व्यवसाय असून निलेश सरोजा आणि किरण बनसोडे शनिवारी रात्री तांबे यांच्या कडे आले आणि म्हणाले की आम्हाला सोनू भाऊ ने पाठवलं आहे, आम्हाला वीस हजाराची खंडणी पाहिजे, संतोष यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने निलेश हा तिथून रागात निघून गेला. परंतु संध्याकाळी तो आपल्या साथीदारा सोबत भाजपा कार्यालयाजवळ संतोष ला गाठून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून पसार झाला. नंतर त्याचा साथीदार किरण बनसोडे याला सोबत घेऊन संतोष तांबे याच्यावर पुन्हा हल्ला केला . या हल्ल्यात संतोष हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते सुनील तांबेकर यांनी थेट माजी नगरसेविका मिताली चांपुर यांचे पती सोनू चांपूर यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप केला आहे . या प्रकरणी निलेश सरोजा आणि त्याचा साथीदार किरण यांच्यावर खंडणी तसेच जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाआहे . तर मुख्य आरोपी निलेश याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार आहे. निलेश याला न्यायालयात हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.