इरा जाधवला विजेतेपद

ठाणे : इरा जाधवने अंजु सिंगचा सहज पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रातील एकमेव महिलांच्या एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेच्या निर्णायक लढतीत नाणेफेक जिंकल्यावर इराने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अंजु सिंगने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत निर्धारित २ षटकात चार चौकारासह बिनबाद २९ धावांचे आव्हान उभे केले. इरानेही या मोठ्या आव्हानाचा सामना करताना २ षटकात बिनबाद ३४ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराने अलिना मुल्लाची स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आणली होती. इराने प्रथम फलंदाजी करताना २ षटकात ३२ धावा केल्या होत्या. अलिनानेही तेवढ्याच षटकात ३२ धावा केल्या पण या दरम्यान ती चार वेळा बाद झाल्याने तिच्या एकूण धावसंख्येतून १६ धावा वजा करण्यात आल्या होत्या. अन्य लढतीत अंजु सिंगने तन्वी चव्हाणवर विजय मिळवला होता.  या लढतीत अंजुने तन्वी समोर २० धावांचे लक्ष्य ठेवले होते.पण तन्वीला केवळ १२ धावाच जमवता आल्या. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पोर्टींग क्लब कमिटीच्या महिला क्रिकेट प्रशिक्षक हेमांगी नाईक आणि सुषमा मढवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *