मुंबई : उकाड्याने हैरान झालेल्या मुंबई आणि ठाणेकरांना आता हुश्श करीत सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही. गेले ६२ तास सुरु असलेल्या जंबो मोगाब्लॉकमधून अखेर त्यांना सुटका मिळाली आहे. मध्ये रेल्व पुन्हा रुळावर आली असून ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली लोकलही रवाना झाली आहे.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या लोकल मेगाब्लॉक आता संपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३६ तासांचा, तर ठाणे स्थानकातून ६२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, हे दोन्हीही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.

धीम्या आणि जलद गतीच्या लोकल रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पहिली धीम्या गतीची लोकल रवाना झाली आहे. त्या मागोमाग आसनगावला जाणारी जलद गतीची गाडी देखील रवाना झाली आहे. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावरील पहिली  लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने रवाना झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल १ वाजून १० मिनिटांनी टिटवाळ्यासाठी रवाना झाली .  ठाणे स्थानकाचा ६२ तासांचा विशेष ब्लॉक देखील संपला आहे. ठाणे स्थानकात घेण्यात आलेला ६३ तासांचा जंबो मेगाब्लॉक संपला आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रवासी सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा असा प्रवास करू शकतात.

गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात जम्बो मेगाब्लॉक सुरू करण्यात आला होता, आता या मेगाब्लॉकचं काम पूर्ण झालं आहे. आज दुपारी साडेतीनची वेळ दिली असतानाही, काम लवकर पूर्ण झाल्याने मेगाब्लॉक लवकर संपवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळेआधीच पूर्ण झालं. या घडीला ट्रॅक बाजूला सरकवणं, ओव्हरहेड वायर यंत्रणा उभी करणं, सिग्नलिंग यंत्रणा उभी करणं, पॉइंट्स तयार करणं, क्रॉस ओव्हर तयार करणं अशी महत्त्वाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं देखील काम जवळपास पूर्ण झालं असून सिमेंटिंग करण्याचं काम पण पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच या प्लॅटफॉर्मवरून प्रवास सुरू करण्यात येईल.

ठाण्याच्या पाच नंबर प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. लवकरच अंतिम परवानगी देऊन नवीन फलाट वापरासाठी खुला केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *