कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केली विचारपूस
अशोक गायकवाड
कर्जत : खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत असताना, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. तेव्हा त्यांच्या (स्कॉड) पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. त्यांच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण त्यांची गाडी ठोकली गेली, दिनांक २१ मार्च २०२४ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांचा मोटारीचा अपघात झाला होता त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून सदिच्छा देण्यासाठी. कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, कोकण प्रदेश सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे, कर्जत तालुका उपाध्यक्ष अंकुश सुरवसे,कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड, वेणगाव पंचायत समिती वार्ड अध्यक्ष नितीन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सतीश रिकिबे यांनी भेट घेतली. त्यावेळी आपल्या अपघाताबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माहिती दिली.*
केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवार ,दि. २१ मार्च २०२४ साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. परंतु, सुदैवाने या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या अपघातानंतर रामदास आठवले यांनी फोनवरुन ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी महाडला होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो. रात्री ९ वाजेपर्यंत महाडमध्ये होते. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेले. त्याठिकाणी त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर ते वाईमध्ये आले. वाईमधून मुंबईला निघाले तेव्हा सव्वा सहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. तेव्हा त्यांच्या स्कॉडमधील पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. त्यांच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण त्यांची गाडी ठोकली गेली, असे ना. रामदास आठवले यांनी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांशी बोलताना माहिती दिली.