मुंबई : जिंकून येण्याची हमी हा मंत्र असणाऱ्या भाजपाप्रणीत महायुतीत अजित पवरांच्या आमदारांचा दारूण पराभव झाला. एक तटकरेंचा अपवाद वगळलला तर अजित पवारांना स्वत:च्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. यामुळे अजित पवारांच्या गटात आमदारात नाराजी वाढली असून आमदारकीच्या निवडणूकीत आपले काय ? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे नाराज असलेले आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती आहे.
शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाने पक्ष आणि चिन्ह दोन्ही हिरावून घेतल्यानंतरही महाराष्ट्रात दहा पैकी आठ खासदार निवडून आणण्याची जादू केली. याऊलट चार जागा लडवून अजित पवार एकच जागा निवडून आणू शकल्याने त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
दरम्यान बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्य दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचलता पाहायला मिळत आहे.
