नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे ‘एनडीएला समर्थन

नवी दिल्ली  : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या बैठकीत आज एकमताने मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यापुर्वी

एनडीएच्या बैठकीमध्ये संयुक्त जनता दलचे नितीश कुमार आणि तेलगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी समर्थन पत्र दिले. त्यामुळे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए आता राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९२ जागा मिळावून बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया आघाडील २३४ जागा मिळाल्या आहेत. एनडीएमध्ये २४० जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एनडीएच्या नेतृत्वाखाली आता मोदींना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. यापुर्वी २०१४ आणि २०१९ साली भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली होती.

दुसरीकडे काँग्रेस ९९ जागांसह इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. तर समाजवादी पक्षाला ३७ तर टीएमसीला २९ जागा मिळाल्या आहेत.

भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या. पण या दोघांनी कोणतीही वेगळी भूमिका न घेता एनडीएला समर्थन दिल्याचं जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *