मुंबई : यंदाच्या सतराव्या लोकसभेत शिवसेनेच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील.

देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार आले आहे. येत्या ९ जूनला मोदी यांचा पंतप्रधानपदी शपथविधी होणार आहे. यावेळी मंत्रीमंडळात शिवसेना शिंदे गटालाही मोठा वाटा मिळणार आहे. शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान,

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 7 जागांवर शिंदे गटाचे खासदार निवडून आले. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. ते दोन लाख नऊ हजार मतांनी विजयी झालेत. औरंगाबादचे संदिपान भुमरे हे एक लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *