५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राची जोरदार तयारी
मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारांची घोषणा केली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना व कर्णधारांना भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे १९ मार्चपासून सुरु असलेले के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर आज संपन्न झाले. समारोपावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवतचे अध्यक्ष श्री विजयकुमार कत्रुवार, सचिव श्री बालकिशन भाऊ चांडक प्राचार्य डॉ. बी. एस. मुंडे, प्रा.डॉ.पवन पाटील, प्रवीण बागल, शिरीन गोडबोले, प्रा.संतोष सावंत, रणजीत जाधव, राम चौखट, विकास सूर्यवंशी, कृष्णा शिंदे, पंकज पवार, खेळाडू व मानवत चे सर्व खेळाडू आदी उपस्थित होते. या शिबिरात खेळाडूंनी कसून सराव केला असून ते अजिंक्यपद खेचून आणतील अशी अपेक्षा सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे अंतिम संघ खालील प्रमाणे जाहीर केले आहेत.
पुरुष गट : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे),अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ (कर्णधार), सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), वेदांत देसाई (मुंबई), प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी) व्यवस्थापक :अनिल नलवाडे (परभणी)
महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर,स्नेहल जाधव,कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे) गौरी शिंदे, संपदा मोरे (कर्णधार), ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली) मिताली बारसकर (मुं. उपनगर). प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी).
