अजित पवारांना भोपळा; शिंदे सेनेची एका राज्मंत्रीपदावर बोळवण
मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश
नितीन गडकरी, पीयुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद
मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद
नारायण राणे, भारती पवार, स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट
जुन्या कॅबिनेटमधील २० मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही
नवी दिल्ली :राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाने मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश केला आहे. यामध्ये नितीन गडकरी, पीयुष गोयल या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मोदींच्या या ७२ जणांच्मंया त्रीमंडळात अजित पवारांना भोपळा तर शिंदे सेनेची एका राज्मंत्रीपदावर बोळवण करण्यात आली आहे.
भाजपाने दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं आहे. स्वतः जीतन राम मांझी यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही मंत्रिपद दिलेलं नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अजित पवार गटाचा पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी ३.० मध्ये एकूण २० नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.
स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. तसेच अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश नाही.
अजित पवारांची सारावा सारव
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला का स्थान नाही याची माहिती देतानी अजित पवार यांनी सारवासारव सारव केली.आम्ही स्वत: काही वेळथांबण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यानुसार आम्ही थांबतआहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
एनडीए आघाडीचं हे सरकार असून अनेक घटक पक्ष असेआहेत, ज्यांना केवळ १ संसद सदस्य आहे, त्यांना एकराज्यमंत्री स्वतंत्र पदभार अशी जबाबदारी देण्याचा निर्णयझाला आहे. तर काही काहीजणांचा एकही खासदार निवडूनआला नाही. पण, सोशल इंजिनिअरींग म्हणून त्यांनामंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, आम्हालाहीएक जागा राज्यमंत्रीपदाची ऑफर करण्यात आली होती, स्वतंत्र पदभार अशारितीने. आमच्याकडून प्रफुल पटेल यांचंनाव देण्यात आलं होतं. मात्र, प्रफुल पटेल यांनी यापूर्वीकॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी निभावाली आहे. त्यामुळे, राज्यमंत्रीपद घेणं योग्य होणार नाही, आम्ही कॅबिनेटपदासाठी आग्रही होतो. त्यासाठी आम्ही थोडावेळथांबण्याचा प्रस्तावही त्यांच्याकडे दिला. त्यानुसार, केवळआमच्या एकट्यासाठी ठरलेला तो फॉर्म्युला बदलणं योग्यहोणार नाही, म्हणून आम्हाला भाजपकडून थोडं थांबण्याचंसूचवण्यात आलं आहे.
अजित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मराठाआरक्षण, सगेसोयरे यांसंदर्भात आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुखएकत्र बसून लवकरच निर्णय घेऊ असे म्हटले. तर, राष्ट्रवादीकाँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझी असून आम्हालाअपयश आल्याचं मी मान्य करतो, असे म्हटले. तसेच, झालेल्या पराभवाची कारणंही अजित पवारांनी सांगितली. तर, मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे, त्यानुसार लवकरच चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केल.

