मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचाजोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवसमुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायमराहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे.

येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानंचांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्येयेत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरातमान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांतसाधारणपणे  ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरातगडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट

ठाणे, रायगड, सोलापूरलातूरधाराशिवनांदेड या जिल्ह्यांतजोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासहदक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेचमराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसहपाऊस पडण्याची शक्यता आहे.

विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार तेअति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणिसोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *