अनिल ठाणेकर 

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार आहेत.

विधानसभेच्या आचारसंहितेनंतर २६ जून २०२४ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापुर्वीची काही कामे थांबलेली असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवरून  सोमवारी, १० जून, २०२४ रोजी आमदार  प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन २६ जून रोजी आचारसंहिता संपल्याबरोबर व ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामे पुर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांही संबंधित सर्व अधिकार्यांना प्रशासकीय स्तरावर असलेल्या सर्व मंजूर्या तात्काळ मंजूर करण्याच्या सुचना केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील खालील कामांविषयी चर्चा झाली.

१)ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील माजिवडा, मोघरपाडा, वाघबीळ, येऊर, रामबाग येथील स्मशानभुमीचे अद्ययावत पध्दतीने नुतनीकरण / सुशोभिकरण करणे.

२) ठाणे महानगरपालिका हद्दीतील उपवन परिसरामध्ये महापौर निवासाशेजारील महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर उपवन जिमखाना बांधण्यासाठी.३) पोखरण रोड नं. २ वरील कॉसमॉस होरायझन लगत ठा.म.पा. सुविधा भुखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे.४) आनंदनगर येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटल शेजारील उद्यानाच्या आरक्षित जागेच्या १५ टक्के जागेवर तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे. ५) वाघबीळ गावाशेजारील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे. ६) माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील विहंग हिल्स येथील ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षित मैदानाच्या जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे.७) मानपाडा येथील कॉसमॉस लॉन्ज सुविधा भुखंडावर ज्येष्ठ साहित्यकार बाबुराव सरनाईक ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे.८) मानपाडा येथील कॉसमॉस लॉन्ज सुविधा भुखंडावर कै. इंदिराबाई बाबुराव सरनाईक महिला बचत गट भवन उभारणे. ९) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड येथील कासारवडवली पोलीस स्टेशन जवळील विकास प्रस्ताव क्र. ८९/१२९ या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र बांधकाम करणे. १०) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील नळपाडा येथील इमारतीमध्ये स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटलसाठी विविध स्थापत्य व इतर आवश्यक कामे करणे. ११) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील प्र.क्र. ७ मध्ये इंडिया बुल्स येथील आरक्षित भुखंडावर लेवा पाटील भवन उभारणे.

१२) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील प्र.क्र. ५ मध्ये गणेशनगर येथील समाज मंदिराची पुर्न:बांधणी करणे. १३) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील कासारवडवली येथील पुराणिक बिल्डर्सच्या सुविधा भुखंडावर विविध समाज भवन उभारणे.१४) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील कासारवडवली मार्केटची पुर्न:बांधणी करणे. १५) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील शिवाईनगर येथील बंद सेप्टीक टँकच्या जागेवर समाज मंदिर उभारणे. या बैठकीमध्ये शहर अभियंता श्री. सोनाग्रा, कार्यकारी अभियंता श्री. संजय कदम, श्री. अतुल कुलकर्णी, उपनगर अभियंता श्री. शैलेंद्र बंडाळे, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल पाटील, सहाय्यक संचालक नगररचनाकार श्री. संग्राम वाठाडे, उपनगर अभियंता श्री. विनोद पवार, प्ल्यटीनम हॉस्पिटलचे डॉ. संजित पॉल, श्रीमती. राणी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *