अशोक गायकवाड
रायगड : राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत हरकती पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-२०२२ च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सुचना दिनांक ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय,२८ राणीचा बाग, जुन्या सर्कीट हाऊस जवळ, पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.om या इमेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.
0000
