हेमंत गोडसेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन
नाशिक : ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ ! या घोषणांनी ठाण्याचा अवघा आसमंत शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे. यासाठीच हे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नाशिकचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेतली. यात मंत्री दादा भुसे, विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि सुहास कांदे यांच्यासह पदाधिकारींचा समावेश होता. जागेचा तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी बसून राहण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी, हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी शिवसैनिक आक्रमक आहेत.