नवी दिल्ली: लोकसभेच्या निकालाआधी एक्झिट पोल व्दारे अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचा घणाघाती आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता मोदींवर टिकेची तोफ डागली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मोदींनी स्वताच्या मंत्रीमंडाळात तब्बल २० घराणेशाहीच्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने २९३ जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला २३४ जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावित आहे. निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या मुद्दयावरुन नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तर, नरेंद्र मोदींकडून शहजादे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं जात.
राहुल गांधींनी आज ट्विट करुन मोदींच्या मंत्रीमंडळातील घराणेशाहीची माहिती दिली, तसेच परिवार मंडल असे म्हणत राहुल गांधींनी भाजप व नरेंद्र मोदींवर टीका केलीय.
मोदींसमवेत तब्बल ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातून ६ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यात, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार आणि 3 राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. त्यामध्ये, भाजप नेते नितीन गडकरी व पियुष गोयल हे पुन्हा एकदा मंत्री बनले असून रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. रक्षा खडसे दुसऱ्यांदा खसादार बनल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहेत. मात्र, रक्षा खडसेंना मिळालेली मंत्रीपदाची संधी ही घराणेशाही असल्याचं स्वत: राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर, मंत्री पियुष गोयल यांचे वेद प्रकाश गोयल हेही मंत्री राहिले आहेत.
राहुल गांधी यांनी व्टिट केलेली २० मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे
एच.डी. कुमारस्वामी
ज्योतिरादित्य शिंदे
किरण रिजेजू
रक्षा खडसे
जयंत चौधरी
चिराग पासवान
जेपी नड्डा
कमलेश पासवान
रामनाथ ठाकूर,
राममोहन नायडू
जितीन प्रसादा
शंतनू ठाकूर
राव इंद्रजीत सिंग
पियुष गोयल
किर्ती वर्धन सिंग
विरेंद्रकुमार खाटीक
रवणीनत सिंग बिट्टू
धर्मेंद्र प्रधान
अनुप्रिया पटेल
अन्नपूर्णा देवी