ठाणे : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेकडून आता अशी दुर्घटना ठाण्यात घडू नये म्हणून होर्डींगची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.अनेक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे पालिकेने धोकादायक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे.
मुंबईसह उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, ठाण्यामध्ये एक धोकादायक होर्डिंगचा निदर्शनास आलं आहे. हे होर्डिंग अतिशय धोकादायक स्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे या परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून आहेत. या प्रकरणी नागरिकांनी पालिकेला तक्रार केली असून त्यानंतर पालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतं पाऊलं उचलली आहेत आणि जागामालक आणि होर्डिंग मालकांना नोटिस पाठवण्यात आल्या आहेत.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग पडल्यामुळे मोठी दुर्घटना झाली. त्यामुळे काही लोकांचा मृत्यू देखील झाले. त्यामुळे मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका यांनी अनेक होर्डिंग मालकांना नोटीस देखील पाठवली होती. त्यातच अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सर्विस रोड या ठिकाणी साधना विला सोसायटी बाजूला सकाळी आलेल्या वादळी वारा पावसामुळे एक होर्डिंग धोकादायक स्थितीत दिसून आले. यामुळे आसपासचा परिसरात राहणारे नागरिकांनी तक्रार केली. तात्काळ होर्डिंग हटवायची मागणी नागरिकांनी केली असून या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोणताही दुर्घटना होऊ नये, यासाठी जाहिरात विभागामार्फत जागामालक आणि होर्डींग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात आली असून त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले.
ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली जवळ, रुणवाल नगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, या ठिकाणी साधना विला सोसायटी बाजूला होर्डिंग धोकादायक स्थितीत असल्याचं आढळून आलं आहे. हे होर्डिंग धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी कोणताही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे पालिकेने संबंधितांना नोटिस जारी केली आहे. धोकादायक होर्डिंगाबाबत जाहिरात विभागामार्फत जागामालक आणि होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात आली असून त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिका अधिकारी यांनी धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंगची पाहणी केली. होर्डिंग संदर्भातील तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.