मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असून ज्या जागांवर एकमत झाल्या आहेत त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटांच्या जागांची घोषणा आज उद्धव ठाकरे करणार आहेत. तशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो.
उध्दव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकते.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असे असतील
- दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
- उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
- उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
- दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
- रायगड – आनंद गीते
- रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
- ठाणे- राजन विचारे
- धाराशिव- ओमराजे निंबाळकर
- परभणी -संजय जाधव
- सांगली – चंद्रहार पाटील
- मावळ- संजोग वाघेरे
- शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
- बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
- हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15.छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
- यवतमाळ वाशिम संजय देशमुख