अशोक गायकवाड

रायगड : ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता ५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६००० रुपये लाभ अदा करण्यात येते.लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९० लाख २० लाभार्थ्यांनी केलेली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ०५ जून, २०२४ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार नुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *