मुंबई : “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार”, असे बारामतीकरांना सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाप्रणीत महायुतीला अल्टीमेटमच दिला. शरद पवारांनी काल बारामतीतील वकिल, डॉक्टर यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. आज त्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांची संवाद साधला आहे.
पाणी- चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही. मुंबईला गेल्यावर सरकारशी बोलेन. चार महिन्यांनी निवडणुका येतील,आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे. तोवर काही करू शकत नाही. इथली शेती करायला मोदी येणार नाहीय,काहीही झालं तर शेती करायची. पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आपण सगळे एकत्रित असलो तर सरकार करेल, मी तुमच्या सोबत असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. आजच्या घडीला संसार चालवायला, दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्यावेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी मी विनंती करतो, असंही शरद पवारांनी सांगितले.
नियमित पाणी आहे, ते मिळायला पाहिजे. माझा दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचे पाणी घेतो, हा उद्योग थांबल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. असेही शरद पवार म्हणाले.