माथेरान : माथेरान मध्ये भारतीय जनता पार्टी आणि माधवबाग, खालापूर (मल्टिडिसिप्लिनरी कार्डीयक क्लीनिक अँड हॉस्पिटल ) यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग, रक्तदाब, व मधुमेह तपासणी शिबीराचे दि.१३ रोजी येथील कम्युनिटी हॉल येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले.यावेळी माधवबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी वर्गाने रुग्णांची उत्तम प्रकारे मोफत तपासणी करून आवश्यक औषधे वितरित केली.
प्रारंभी देवतांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, किरण चौधरी, शैलेश चाफेकर, शैलेंद्र दळवी,विलास पाटील,संदीप कदम,संतोष कदम, महिला आघाडीच्या प्रतिभा घावरे,सुहासिनी शिंदे, हेमलता कदम, संध्या शेलार,कांचन केतकर यासंह अन्य उपस्थित होते.
माधवबाग मधील वैद्यकीय टीम मधील ओपीडी सीनियर हेड अमित पाटील,तुषार पाटील, अरुण यादव,प्रशांत गदमले, राजेंद्र माटल,श्याम सरोज,अमन सिंग,वैजयंती हनुमंते, शोभा धनगावकर आदीनी सर्व रुग्णांची उत्तम प्रकारे तपासणी करून औषधे वाटप केली.
मागील काही वर्षांपासून माथेरान मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले आहेत तर गरजवंताला, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. गावातील प्रत्येक कार्यक्रमात भाजपचे संघटन सहभागी होऊन वेळप्रसंगी मदतीचा हातभार लावत आहेत.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी तसेच महिला आघाडीने सुध्दा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे.
